सावर्डे दुमाला येथे गांधीजी व शास्त्रीजी यांना जयंतीदिनी अभिवादन : स्वच्छता अभियान कार्यक्रम
करवीर :
२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे या दोन महान नेत्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. करवीरचे माजी सभापती पांडुरंग पाटील यांच्या हस्ते फोटोपूजन व माजी सरपंच भगवान पाडळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच भगवान रोटे, उपसरपंच प्रकाश कदम उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्या मंदिर सावर्डे दुमाला प्राथमिक शाळेत झालेल्या रांगोळी व भाषण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालय सावर्डे – सडोली दुमाला हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक तोरस्कर सर यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रारंभी प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील व उपाध्यक्ष मनोहर पाटील यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. मुख्याध्यापक शिवाजी वेदांते सर यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत माध्यमिक विद्यालय
सावर्डे – सडोली दुमाला व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या समवेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी पी.के.कारंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळवंत कारंडे, दामाजी रोटे, शामराव खाडे, गणपती निकम, निवृत्ती कारंडे, ग्रामसेवक एस.जी.वाडकर, ग्रामपंचायत सदस्य तुषार निकम, हिंदुराव भोसले, दिंगबर कारंडे, ताई खाडे, संगीता भोसले, भारती भोसले, अर्चना कांबळे, रुपाली सुतार, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी वेदांते सर, सर्व शिक्षक, माध्यमिक विद्यालय सावर्डे – सडोली दुमालाचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.