गोकुळ’ च्‍या २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन ……

कोल्‍हापूर:ता.२३.गोकुळची दिनदर्शिका हा गोकुळचे दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औस्तुक्याचा विषय असतो.२०२३ सालची प्रकाशित करण्यात आलेली हि दिनदर्शिका दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत माहितीपूर्ण ठरेल, असे उद्गार गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी काढले. गोकुळच्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते.

       यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ आपली दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असते, यावर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये दूध उत्पादकांच्या गायी-म्हैशीचे आरोग्य आणि दूध व्यवस्थापण याची माहिती उत्पादकास यातून मिळणार आहे. दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती संग्रही ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील उजव्या कोपऱ्यात क्यू.आर. कोड देण्यात आला आहे. हा कोड आपल्या स्मार्ट फोनने स्कॅन केल्यावर त्या विषयाची विस्तृत माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवता येणार आहे. या माहितीचा उपयोग नित्यनेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे.असे मनोगत व्यक्त केले.

      यावेळी बोलताना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले कि गोकुळ अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब नेहमीच करत असतो आपल्या सोबतच्या आपल्या दूध उत्पादकांनी हि अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने स्मार्ट फोनच्या माध्यमातून स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हि दिनदर्शिकेचा  उपयुक्त ठरेल  अशी माहित  दिली.

      या दिनदर्शिका संघाशी सलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थाना देण्यात येणार आहेत.तसेच सूत्रसंचालन एम.पी.पाटील व आभार संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही तुरंबेकर यांनी मानले.

यावेळी चेअरमन विश्वास पाटील, जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे,संचालक अभिजीत तायशेटे, अजित नरके,शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले,नंदकुमार ढेंगे,बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके,विजयसिंह मोरे,संचालिका श्रीमंती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!