‘गोकुळ’ सहकारातील एक आदर्श दूध संघ : डॉ. शादाब हुसेन
कोल्हापूर (दि.०५) :
जम्मू काश्मीर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सक्षमीकरण उपक्रमा अंतर्गत जम्मू पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व प्रगतिशील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला भेट दिली. या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश हा जम्मू राज्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकरी सक्षम करणे हा होता.

गोकुळ दूध संघ देशातील सहकार क्षेत्रातील दूध संघाकरिता दीपस्तंभ आहे. असे उद्गार डॉ शादाब हुसेन – पशुसंवर्धन अधिकारी जम्मू यांनी काढले.गोकुळने दूध उत्पादक शेतक-यांसाठी आपल्या कार्यक्षेत्रात विविध योजना राबवून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे साधलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत गोकुळ ने निर्माण केलेले जाळे आणि त्यातील व्यवस्थापन कौशल्य हे कौतुकास्पद आहे.
गोकुळ दूध संघाने सहकाराच्या माध्यमातुन या प्रक्रियेतील सर्वच घटकांना एकत्र बांधून, सर्वांचा विकास साधून महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायत धवल क्रांती निर्माण केली आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे जम्मूच्या दूध उत्पादन शेतकऱ्यांना व तेथील सहकार चळवळ रुजवण्या करिता नक्कीच फायदा होईल. तसेच गोकुळचे व जम्मू काश्मीरचे व्यापारी व मैत्रीपूर्ण संबध जोडण्यास प्रयत्नशील राहू. असे मनोगत गोकुळला दिलेल्या भेटी प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी गोकुळच्या सर्व संचालक मंडळ व अधिकारी यांना जम्मू येथे मार्गदर्शन करिता येण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी संघाच्या गोकुळ प्रकल्प भेटीवेळी त्यांचे स्वागत कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. संघाच्या पशुसंवर्धन, संकलन, डेअरी, मार्केटिंग, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना व इतर सर्व विभागाची सविस्तर माहिती व चर्चा केली व आभार डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी यांनी मानले.
यावेळी जम्मू पशुसंवर्धन विभाग, डॉ शादाब हुसेन (जम्मू), डॉ संदीप कुमार पी.आर.ओ, (ए.एच.डी जम्मू), हेमंत जाधव पुणे, प्रणव पवार पुणे, संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, डॉ.साळुखे, डॉ.दळवी, डॉ मगरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.