केंद्र व राज्याने : उसाची एफआरपी जाहीर करावी
कोल्हापूर :
साखर कारखान्यांचा 2021 /22 चा हंगाम चार महिन्यावर आला आहे.यामुळे केंद्र व राज्य शासनाने उसाची एफआरपी जाहीर करावी.उसाची आधारभूत किंमत माहिती असणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे.अशी मागणी यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली आहे.
यावेळी पाटील म्हणाले,शुगर केन ऑर्डर प्रमाणे केंद्राने एफआरपी जाहीर करण्याचा अधिकार काही प्रमाणात राज्यांना दिला आहे.
येणारा 2021 22 चा गाळप हंगाम तोंडावर आला आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या वतीने उसाची एफआरपी जाहीर केली जात होती, ऑक्टोबरमध्ये एफआरपी जाहीर करण्यात येत होती. जुलै महिना आला तरी अद्याप राज्य शासनाने एफआरपी जाहीर केलेली नाही, हा विषय आता राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे, दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीने एफआरपी
जाहीर केली जात होती, त्यानंतर साखर कारखान्याच्या वतीने यामध्ये अधिक दर देऊन हंगाम घेतला जात होता, एफ आर पी चा दर जाहीर केल्यानंतर साखर कारखाने अधिक सदर देत होते, यामुळे शेतकऱ्यांच्या कडून कोणत्या साखर कारखान्याला ऊस घालयचा हे निश्चित केले जात होते.
अद्याप राज्य शासनाने एफ आर पी जाहीर केलेली नाही,एक जुलै पासून काही कारखाने ऊसाच्या नोंदी घेतात, एक आर पी जाहीर न केल्याने ,नोंदी देण्याबाबत व शेतकऱ्यांच्यात याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, दरम्यान यंदा इंधनाचे दर वाढले ,खतांचे दर वाढले, कीटकनाशकाचे दर वाढले, उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे एफआरपी जाहीर करताना उत्पादन खर्चावर आधारित दर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. एफ आर पी जाहीर करण्याबाबत साखर सम्राट मुग गिळून गप्प आहेत . यंदा या वर्षीच्या रिकव्हरी वर यावर्षीची एफआरपी निश्चित केली जाण्याची शक्यता असून, एफ आर पी मध्ये तुकडे पाडण्याचे धोरण साखर कारखानदारांच्या कडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले.