रासायनिक खत डीएपीचा दर प्रतीपोते सुमारे ५५० रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता
जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा
खत दरवाढीचे कंपन्यांचे विक्रेत्यांना संकेत
टीम ग्लोबल
कोल्हापूर :
नवीन आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून रासायनिक खताचे दर गगनाला भिडण्याची श्यक्यता आहे . दरवाढीचे
संकेत कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यात डीएपी खत खत शॉर्ट झाले आहे. खरीप हंगामाचा विचार करता,एक लाख 89 हजार टन खत जिल्ह्यासाठी लागते.खताची दर वाढ झाल्यास सुमारे 50 कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सध्या उन्हाळी हंगाम संपत आला आहे , साखर कारखान्यांचा हंगाम संपले आहेत . ऊस भरणी चा हंगाम सुरू आहे. ऊस वाढीसाठी डीएपी मध्ये
स्फुरद चे प्रमाण जास्त आहे . यामुळे डीएपी खताला मागणी वाढली आहे.मात्र डीएपी खताचा तुटवटा झाला आहे . यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर करत आहेत . डीएपी खत मिळत नसल्याने हाथ मिश्रखत उत्पादन बंद झाले आहे .
एका महिन्यात डीएपी खताचा दर चार वेळा वाढला आहे,1330 वरून 1550 दर झाला आहे . याबाबत खत कंपनी यांच्याशी संपर्क साधला असता उत्पादन खर्च वाढल्याने, व शासनाकडून अनुदान न वाढल्यास दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे . डीपी खताच्या पोत्याला 550 रुपये पर्यंत दर वाढ होण्याची शक्यता आहे.ही दर वाढ झाल्यास खरिपाच्या एका हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 50 कोटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रशासन विद्राव्य खते सोडून खत कंपन्यांना अनुदान देते, उत्पादन खर्च वाढल्याने , खताला अनुदान न वाढल्यास ही दरवाढ होणार आहे. या दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या तूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कृष्णात पाटील, वाकरे शेतकरी,
खत दरवाढ हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.शेतकरी आर्थिक अडचणीत आहे .शासनाने खत दर वाढ करू नये.
तानाजी निगडे रयत संघ व्यवस्थापक ,
शासनाने अनुदान न वाढविल्यास खत दरवाढ होईल , डीएपी खताचा दर सुमारे 1700 रुपया पर्यंत जाईल. असा अंदाज आहे.
चंद्रकांत सूर्यवंशी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद ,
खत दर वाढ होण्याचे संकेत आहेत , पोत्याला 150 ते 200 रुपये वाढ होईल असा अंदाज आहे .