लसीकरणास 1 मे पासून शुभारंभ :
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे
प्रायोगिक तत्वावर

कोल्हापूर :

कोव्हिड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. 1 मे 2021 रोजी प्रायोगिक तत्वावर ग्रामीण रूग्णालय शिरोळ, वसाहत रूग्णालय गांधीनगर, ग्रामीण रूग्णालय कागल, प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव, ता. शाहूवाडी व भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करून शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येताना केंद्र शासनाच्या cowin portal वर ऑनलाईन नोंदणी करून ऑनलाईन भेट निश्चित (तारीख व वेळ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आहे. येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे.

ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन भेट निश्चित नसल्यास नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ऑनलाईन नोंदणी करताना नागरिकांनी 18 ते 44 या वयोगटाची निवड करून नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नोंदणी मर्यादित स्वरूपाची (200 लाभार्थी प्रति दिवस) आहे. ही प्रायोगिक तत्वावरिल लसीकरण केंद्र पुढील 7 दिवस (दि. 7 मे 2021 पर्यंत) वर नमुद केलेल्या 5 ठिकाणी सुरू राहणार आहे, अशी माहितीही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!