शेतकरी संघटनांच्या ‘भारत बंद’ला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

जिल्हाध्यक्ष – सतेज डी पाटील

कोल्हापूर :

केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रीय पाठिंबा असून या बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्ष जिल्हाभर उपोषण करणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज डी पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आजी, माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरेसवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेलचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हा कॉग्रेस कमिटी समोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करणार आहेत.

शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. परंतु हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकारच्या या मनमानी व हुकुमशाहीचा विरोध उपोषण करून केला जाणार आहे.जिल्हा कॉग्रेस कमिटी, स्टेशन रोड, कोल्हापूर.
शुक्रवार दि.26,
सकाळी 11.00 वा. आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!