बालिंगा येथे लक्ष्मी ऑइल मिल शाखेचा उदघाट्न समारंभ दिमाखात
करवीर :
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या लक्ष्मी ऑइल मिल कोल्हापूर या दुकानाच्या बालिंगा येथील शाखेचा उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला. गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विश्वासराव पाटील (आबाजी ) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वीरशैव बँकेच्या संचालिका रंजना कृष्णात तवटे व व कृष्णात तवटे यांनी सर्वांचे स्वागत केले.
लक्ष्मी ऑइल मिल कोल्हापूरचे मालक कृष्णात तवटे म्हणाले, प्रामाणिकतेच्या बळावर
लक्ष्मी ऑइल मिलने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंतही तातडीने वितरण सेवा व्हावी यासाठी बालिंगा येथे दुकान शाखा सुरु केली आहे. येथील ग्राहकांचा आम्हाला निश्चित प्रतिसाद राहील असा आशावाद व्यक्त केला.

उद्घाटन समारंभात वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल स्वामी, किराणा व भुसारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष सुनील गाताडे, तुकाराम पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, रंगराव वाडकर, बालिंगा संरपच विजय जांभळे, संतोष जाधव विजय जत्राटे, राजू वाली, शिरोली दुमालाचे माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस.के.पाटील, माधव पाटील यांचेसह परिसरातील नागरिक, ग्राहक उपस्थित होते. केतन तवटे व अमर तवटे यांनी आभार मानले.