धामणी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात : आ.पी.एन.पाटील

कोल्हापूर :

गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या, दीर्घकाळ रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून ३१४ कोटी रुपयांची निविदा दि.१४ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील राई येथील ३.८५ टी.एम.सी.क्षमतेच्या धामणी प्रकल्पामुळे गगनबावडा,पन्हाळा व राधानगरी तालुक्यातील जवळपास 1500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच दरवर्षी भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे, अशी माहिती आ.पाटील यांनी दिली.

गतवर्षी या प्रकल्पासाठी निविदा निघाली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, संकटामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जलसंपदा मंत्री नाम.जयंत पाटील यांना भेटून धामणी प्रकल्पाचे काम थांबले ते सुरू करण्याची मागणी केली असता निधी अभावी रखडले असून नाम.अजित पवार यांना भेटून निधीची मागणी करण्यास सांगितले. त्यानुसार मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ना.पवार यांनी या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतुद करून दिली. तसेच आगामी काळात धामणी प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिनांक १४ मे रोजी ३१४ कोटी रूपयांची निविदा प्रसिद्ध केली जाणार असून यातून ऊर्वरित मातीकाम, प्रवेश व पुच्छ कालव्या सह सांडवा तसेच सिंचन तथा विद्युत विमोचकाचे ऊर्वरीत काम, अप्रोच रस्ता व पुलांचे बांधकाम केले जाणार असल्याचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!