दोनवडे येथे पूर परिस्थिती जैसे थे : रस्त्यावर अद्याप दीड फूट पुराचे पाणी
करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर दुपारी 3 वाजता दीड फूट पुराचे पाणी राहिले होते. दरम्यान रात्री 8 वाजता पुराची स्थिती, दीड फूट पुराचे पाणी जैसे थे राहिले आहे, दरम्यान पोलिसांनी वाहतुकीस मनाई केली आहे .
नागरिक या ठिकाणी पाण्यातून ये जा करत आहेत .कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.पावसाने उघडीप दिल्याने पूर ही उतरत होता .
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप दीड फूट पुराचे पाणी आहे.सहा वाजेपर्यंत रस्त्यावरील सर्व पाणी ओसरण्याची शक्यता होती मात्र तीन वाजल्यापासून पाणी ओसरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, यामुळे दीड फूट पुण्याचे पुराचे पाणी जैसे थे राहिले आहे.
सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे अडीच तास पोलिसांनी वाहतूक रोखुन धरली यामुळे दुधाचे टेम्पो थांबले होते.
दरम्यान पूर परिस्थितीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने दोनवडे साबळेवाडी खुपीरे शिंदेवाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, महावितरण कंपनीने वीज पुरवठा पूर्ववत करून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.