करवीर :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीर पंचायत समितीचे व कोल्हापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, भोगावती कारखान्याचे माजी संचालक, श्री शाहू शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन कै. बी.के. पाटील सोनाळीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सोनाळी (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते कै. बी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच नियोजित प्रवेशद्वाराचे भूमिपूजन माजी उपसभापती मारुती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बी.के.पाटील द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने रविवारी प्रतिमापूजन व प्रवेशद्वाराचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव विजयराव बोंद्रे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी कवठेकर, श्रीपतराव दादा बँकेचे संचालक सुरेश पाटील, सरपंच मोहन पाटील, विष्णुपंत पाटील, मच्छीन्द्र पाटील, आनंदराव पाटील, पोपट पाटील, गणपती मोरे, नामदेव कांबळे, कृष्णात पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.