गोकुळ : फरकापोटी दूध उत्पादकांना गतसालच्या तुलनेत १९ कोटी रुपये इतकी जादा रक्कम मिळणार : अध्यक्ष विश्वास पाटील
कोल्हापूर :
दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या खात्यावर ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा करण्यात येणार आहे. यंदा, फरकापोटी दूध उत्पादकांना गतसालच्या तुलनेत १९ कोटी रुपये इतकी जादा रक्कम मिळणार आहे.
संघाने विविधबाबीमध्ये बचतीची धोरण अवलंबिले असल्याने टँकर वाहतूक, रोजंदारी कर्मचारी कपात महानंद पॅकिंग खर्च बचत ,दूध वाहतूक टेम्पो भाडे कपात या सर्व बाबीतून झालेली बचत व म्हैस दूध पावडर विक्रीतून झालेला नफा या सर्व बाबीमुळे गतसालच्या तुलनेत संघाच्या अंतिम दूध दरफरकाची रक्कम १७ कोटी ६२ लाख तसेच दरफरकावरील ६% प्रमाणे ६ महिन्याचे व्याज ६२ लाख रुपये, डिबेंचर्स व्याज ६ % प्रमाणे १५ लाख तसेच संस्थाना डिव्हीडंड ११ % प्रमाणे ६५ लाख असे एकूण १९ कोटी ४ लाख इतकी जादाची रक्कम प्राथमिक दूध संस्थाना व दूध उत्पादकांना मिळणार आहे व वरील रक्कमेमध्ये म्हैस व गाय दूध उत्पादकांसाठी २० पैसे प्रतिलिटर दरफरक जादा समाविष्ट आहे.
म्हैस दूधाकरीता दरफरक:
म्हैस दूधाकरीता ५८ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपये
गाय दूधाकरीता दरफरक:
गाय दुधाकरीता २९ कोटी ७१ लाख २० हजार रुपये
दि.१ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील म्हैस व गाय दूध दर फरकावरील ६ % प्रमाणे व्याज :३ कोटी ४८ लाख रुपये
दि.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ संघाकडे जमा असणाऱ्या डिबेंचर्स ६ % प्रमाणे व्याज: ४ कोटी ७२ लाख रुपये
सन २०२१ ते २०२२ भांडवलवर ११ % प्रमाणे डिव्हीडंड :५ कोटी ९८ लाख
संघाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत: वैरण बियाणे, चाफकटर, मिल्को टेस्टर, वासरू संगोपन अनुदान, जातिवंत म्हैस व गाय संगोपन अनुदान, दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी योजना, किसान पॅकेज, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा अशा २७ योजनेवर प्रतिलिटर ७५ पैसे म्हणजेच अंदाजे ३७ कोटी ४१ लाख इतकी रक्कम उत्पादकांना अनुदान व सेवाप्रित्यर्थ पोटी दिले आहेत.
** आय.व्ही.एफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भ प्रत्यारोपण कार्यक्रम **
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन या प्रकल्पा अंतर्गत दूधाळ जनावरांचा गतिमान जात सुधारणा कार्यक्रम तयार केला आहे. सदर योजना एन.डी.डी.बी मार्फत गोकुळ सलग्न दूध संस्थेमध्ये पुढील तीन वर्षे कालावधीसाठी निवडक ५०० जनावरांमध्ये (गायी व म्हैशी) राबविण्यात येणार आहे. तथापी सन २०२२ -२३ या चालू सालामध्ये गायीचे ४०गर्भ व म्हैशींचे ११० असे एकूण १५० गर्भ मंजूर झाले आहेत. दि. ०१ ऑक्टोबर २०२२ पासून गोकुळ संघामध्ये गायीमध्ये प्रत्यक्ष गर्भ प्रत्यारोपण कामकाज सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये कमी कालावधीत म्हणजेच एका पिढीमध्ये उच्च वंशावळीचे जातीवंत व फक्त मादी वासरांची पैदास होणार आहे. सदर योजनेमध्ये जनावर गाभण राहिल्याची खात्री झाल्यानंतर रू.२१,०००/- प्रति जनावर इतका खर्च येणार असून त्यापैकी केंद्र शासनाकडून रु.५०००/- व दूध संघातर्फ रु.५०००/-इतके अनुदान देण्यात येणार असून उर्वरित रु ११,०००/-इतकी रक्कम लाभार्थी दूध उत्पादकांच्या दूध बिलातून कपात करण्यात येणार आहे.
सबब या प्रकल्पाची एकून ५०० गर्भ प्रत्यारोपणासाठी संघामार्फत रु.२५ लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना देण्यात येणार आहे.
“ दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. राज्याचे माजी ग्रामविकास व कामगारमंत्री आमदार व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू. यासाठी दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतकांना दसरा व दीपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !!’’
यावेळी माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,तज्ञ संचालक युवराज पाटील, विजयसिंह मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व एन.डी.डी.बी. चे अधिकारीडॉ एस.पी.सिंग ,डॉ देवेंद्र स्वामी, डॉ.जनार्दन कातकाडे, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले व संघाचे अधिकारी उपस्थित होते.