पूर अपडेट : दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप दीड फूट पुराचे पाणी
करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर दुपारी 3 वाजता, दीड फूट पुराचे पाणी राहिले आहे.नागरिक या ठिकाणी पाण्यातून ये जा करत आहेत .कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.पावसाने उघडीप दिल्याने पूर ही उतरत आहे .
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप दीड फूट पुराचे पाणी आहे.सहा वाजेपर्यंत रस्त्यावरील सर्व पाणी ओसरण्याची शक्यता आहे.