राहुल पाटील यांचा कसबा बीड, शिरोली दुमाला परिसरात संपर्क दौरा : स्व. पी.एन साहेबांसारखेच राहुल पाटील यांच्या पाठीशी निष्ठेने राहण्याचा कार्यकर्त्यांचा मनोदय
कोल्हापूर :
आमदार स्व.पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील यांनी करवीर विधानसभा मतदार संघातील गावागावात जाऊन दुःखाच्या प्रसंगी सर्वांनी धीर दिल्याबदल कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच स्व. साहेबांचे व कार्यकर्त्यांमधील जिव्हाळ्याचे नाते असेच कायम राहील असा विश्वास सर्वांना दिला. कसबा बीड, शिरोली दुमाला परिसरातील गावामध्ये केलेल्या संपर्क दौऱ्यास कार्यकर्त्यांची गर्दी होती.
राहुल पी.पाटील यांनी संपर्क दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात करवीर विधानसभा मतदारसंघातील कसबा बीड, शिरोली दुमाला, केकतवाडी, सावरवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर, म्हारुळ, आमशी, वाघोबाचीवाडी या गावांना भेट देऊन संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार स्व. पी.एन.पाटील साहेबांनी आम्हा कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम केले. ज्या पद्धतीने आम्ही स्व. साहेबांवर निष्ठेने राहिलो त्याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस विचारधारा धरूनच चालू आणि निष्ठेने आपल्या पाठीशी राहू असा ठाम मनोदय व्यक्त केला.
मा. विश्वास पाटील (आबाजी), गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शंकरराव पाटील, भारत पाटील -भुयेकर,सत्यजित पाटील, सुभाष सातपुते, सज्जन पाटील, सर्जेराव पाटील (नाना), एकनाथ पाटील, मा. विजय भोसले, बुद्धीराज पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, कृष्णात चाबूक, नंदुभाऊ पाटील, सरदार पाटील, कृष्णात धोत्रे, प्रकाश मुगडे, सर्जेराव पाटील, शिवाजी कवठेकर, बळी चव्हाण, निवास पाटील, सूर्यकांत दिंडे, रघुनाथ वरुटे आदी उपस्थित होते.