दोनवडे येथे उद्या सोमवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा : शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना कुंभी परिसरच्या वतीने आवाहन
करवीर :
दोनवडे ता. करवीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. मागील ऊस हंगामातील दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा ही मागणी घेऊन १३ सप्टेंबरला साखर संघावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभी परिसर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार (दि. ४)सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. दोनवडे येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान अंतर्गत दोनवडे येथे होणाऱ्या या सभेला
कुंभी परिसरासह तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना कुंभी परिसरच्या वतीने करण्यात आले आहे.