दुर्मिळ मासा
खुपिरे भोगावती नदीत सापडला कोयरा जातीचा दुर्मिळ मासा
26 किलो वजन आणि पाच फूट उंची
कोल्हापूर :
खुपिरे ता. करवीर येथील भोगावती नदीत कोयरा जातीचा दुर्मिळ मासा कोळ्याला सापडला,26 किलो वजन आणि पाच फूट उंची होती. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती, दरम्यान हा मासा दुर्मिळ असेल तर या माशाचे संवर्धन केले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचगंगा नदीला ,भोगावती नदी आहे तसेच भोगावती नदीला मागे राधानगरीतून आणि गगनबावडा धरणातून पाणी येत असते. यामुळे नदी बारमाई वाहते तसेच नदीचे पात्रही रुंदावले आहे ,यामुळे भोगावती, पंचगंगा नदीत माशांची पैदास वाढत आहे.
खुपिरे येथील कोळी शशिकांत आंनदा गवळी,नितीन व ओंकार गवळी नेहमी नदीत मासेमारी करतात, आज सकाळी पहाटे चार वाजता भोगावती नदीत शिंदेवाडी परिसरात नदीत गळ टाकले होते, साडेनऊ वाजता गळाला मोठा मासा लागल्याचे निदर्शनास आले यावेळी,शशिकांत गवळी,नितीन व ओंकार गवळी यांनी शिताफीने हा मासा नदीबाहेर काढला, ही माहिती गावात समजतात मासा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उडाली.
याचे वजन केले असता 26 किलो भरले तसेच सुमारे पावणे पाच ते पाच फूट उंची होती, याबाबत बोलताना शशिकांत गवळी म्हणाले पाच वर्षांपूर्वी या नदीत 23 किलोचा कोयरा मासा सापडला होता, त्यानंतर ज्यादा वजनाचा हा मासा सापडला आहे.याची पैदास वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या माशा बाबत माहिती घेतली असता हा मासा दुर्मिळ आहे, गोड्या पाण्यात नदीत आढळून येतो, सुमारे 40 ते 50 किलो पर्यंत वजन होते, या माशाची पैदास कमी असते ,यामुळे हा दुर्मिळ असतो, या माशाचा जबडा मोठा होता आणि कल्ले तांबड्या लाल रंगाचे होते दोन फुटाच्या मिशा होत्या.
…………
नामदेव तीकोणे, संचालक कोल्हापूर जिल्हा भोई समाज,
शिंगणापूर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला असे मोठे मासे सापडतात ,या माशांची पैदास कमी आहे, माशांचे संवर्धन तलावात करणे गरजेचे आहे ,नैसर्गिक पद्धतीने पैदास वाढली पाहिजे हा मासा मांसाहारी आहे.