कोल्हापूर येथे  २६ ते २८ मार्च  रोजी तांदूळ , गूळ , धान्य महोत्सवाचे आयोजन

प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत खरेदीदार व विक्रेता संमेलन ,२७  रोजी पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित

कोल्हापूर :

महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने तांदूळ , गूळ , धान्य महोत्सव , पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा , प्रभात फेरी तसेच प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्धोग अंतर्गत खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आली आहे . महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२१/२२ अंतर्गत तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व लोकांना पटवून देऊन त्याची मागणी निर्माण करणे व त्या माध्यमातून या पिकांखालील क्षेत्रात वृध्दी करण्यास शेतक – यांना प्रोत्साहित करणे या हेतूने प्रचार व प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत .

दिनांक २५ रोजी सकाळी १० वाजता श्री . जोतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे , निगवे दुम येथे आरोग्य विभाग , एकात्मिक बाल विकास प्रकल्प , शिक्षण विभाग इत्यादी मार्फत विद्यार्थी / माता पालक यांचे मदतीने ग्रामीण भागामध्ये ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे . तसेच , यशवंतराव चव्हाण सभागृह , राजाराम महाविद्यालय , कोल्हापूर येथे दिनांक २६ रोजी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजित केले आहे . दिनांक २७ रोजी पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करणेत आली आहे .

यामध्ये तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व लोकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाबरोबर आत्मा यांचे समन्वयाने कृषि विद्यापीठे , आहारतज्ञ , प्रगतीशील शेतकरी उत्पादक , स्थानिक लोकप्रतिनिधी इ . समावेशाने एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे .

२७ रोजीचे जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये सकाळी ११ वाजता आहारतज , प्रगतशील शेतकरी , उत्पादक , स्थानिक लोकप्रतिनिधी इ . समावेशाने सदर कार्यशाळेमध्ये तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान , तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे . तृणधान्य पिकांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावून त्याव्दारे माहिती देण्यात येणार आहे .

यशवंतराव चव्हाण सभागृह , राजाराम महाविद्यालय , कोल्हापूर येथे तसेच २६ ते २८ मार्च २०२२ रोजी तांदूळ , गूळ , धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे .
या संधीचा ईच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक  ज्ञानदेव वाकुरे  यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!