कुंभी ३०४५ एकरकमी एफआरपी देणार : चेअरमन चंद्रदीप नरके : ५९ वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन
करवीर :
कुंभी कासारी साखर कारखान्यावर आर्थिक संकटे आली तरी शेतकरी सभासद, कामगार व तोडणी वाहतूकदार यांना शासन ज्या सोयी सवलती जाहीर करेल त्या दिल्या आहेत. शासनाने साखरेला ३६ रूपये साखरेला हमी भाव देण्याची गरज आहे.
या वर्षी ३ हजार ४५ रूपये प्रति टन एक रकमी एफआरपी देणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कुडीत्रे ता करवीर येथील कुंभी कासारी साखर कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी चेअरमन
चंद्रदीप नरके बोलत होते. संचालक विलास पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन निवास वातकर, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, शेती अधिकारी संजय साळवी,चिफ इंजिनिअर संजय पाटील आदी उपस्थित होते.