राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले
राधानगरी :
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले झाले असून, १४०० क्यूसेक प्रमाणे आणि विज निर्मितीसह ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.भोगावती, पंचगंगा नदीचा पूर ओसरू लागला असला तरी,आता दरवाजे उचलल्याचे पुराचे पाणी स्थिर राहण्याची श्यक्यता आहे.
धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने पाणी पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.
गेट नं ६ व ३ ओपन झाले आहेत. त्यामधून प्रत्येकी १४०० क्युसेक्स प्रमाणे,व पाॅवर हाऊसमधून, असे एकूण ४२५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.दरम्यान भोगावती, पंचगंगा नदीचा पूर ओसरू लागला असला तरी,आता दरवाजे उचलल्याचे पुराचे पाणी स्थिर राहण्याची श्यक्यता आहे.