करवीर :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या शिवजयंतीचे औचित्य साधून गगनगिरी ट्रॅक्टर रिपेअरिंग गॅरेजचे मालक दत्तात्रय तोरस्कार व गगनगिरी ऑटो इलेक्ट्रिक्स वर्क्सचे मालक अविनाश तोरस्कर यांच्या संयुक्त विद्यमाने गगनबावडा तालुक्यातील शाळांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे डिजिटल फलक शाळांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला. तोरस्कर कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

गगनबावडा तालुक्यातील धुमाळवाडी येथील विद्या मंदिर शाळेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचे डिजिटल फलक भेट देण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय तोरस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनात नितांत आदर आहे. विद्यार्थी दशेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहावा या उद्देशाने शाळेमध्ये हे डिजिटल फलक देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी सागर चौगले, तुकाराम चौगले, जे.डी.शिंदे, रखमाजी पाटील, भागवत शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी प्रस्ताविक बबन नंदगावकर यांनी तर आभार जयसिंग पडवळ यांनी आभार मानले.