मयत बांधकाम कामगाराच्या पत्नीला २ लाख ३४ हजारचे अर्थसहाय्य : राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे संजय सुतार यांचा पाठपुरावा
करवीर :
राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे नोंदीत कामगार आनंदा निवृत्ती मुसळे (सडोली दुमाला, ता. करवीर) यांचे निधन झाले. मृत झालेल्या बांधकाम कामगाराच्या पत्नीला, त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुतार यांनी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला. कल्याणकारी महामंडळाकडून २ लाख ३४ हजार रक्कमेचे अर्थसहाय मंजूर झाले. या मंजूर रकमेचा धनादेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुतार, सुनीता सुतार यांच्या हस्ते मयत कामगार आनंदा मुसळे याच्या पत्नी उषा आनंदा मुसळे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी संजय सुतार यांनी बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी सदैव कामगारांच्या पाठीशी राहतील असा विश्वास दिला. पतीच्या निधनानंतर संघटनेने पाठपुरावा करून शासनाकडून अर्थसहाय मिळवून दिल्याबद्दल संजय सुतार व संघटनेचे आभार मानले.