दूध उत्पादकांना भरघोस दर फरक व दूध संस्था सक्षमीकरणासाठी डिबेंचर्स देणारा गोकुळ..

चेअरमन विश्वास पाटील

कोल्हापूर:ता २८:

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर गोकुळने सन २०२०-२०२१ या वर्षामधील प्राथमिक दूध संस्थानी संघास पुरविलेल्या म्हैस व गाय दुधास अनुक्रमे रू २.०५पैसे व रू १.०५पैसे या प्रमाणे दूध दर फरक व दूध संस्थाना प्रती लिटर ०.५५ पैसे रक्कम डिबेंचर्स दिले आहे. डिबेंचर्स ची रक्कम संबधित दूध संस्थेच्या नावावर संघात जमा असून त्यारक्कमेवर संघाकडून प्रत्येक वर्षास व्याज देण्यात येते. वार्षिक सर्वसधारण सभेने दिलेल्या मंजूरी नुसार सदर डिबेंचर्स रक्कम १० वर्षानंतर संबधित दूध संस्थेच्या शेअर भांडवला मध्ये वर्ग करण्यात येते. शेअर भांडवलावर आकर्षक असा डिव्हींडंट देण्यात येतो. यामुळे संघाचे भागभांडवल वाढल्याने संघास आर्थिक बळकटी मिळाली आहे. तसेच दूध संस्थाही आर्थिकदॄष्टया सक्षम झाल्या आहेत. काही दूध संस्था आलेला डिव्हीडंट दूध उत्पादकांना दरफरक रक्कमेमध्ये अधिक रक्कम करून देतात किंवा दूध उत्पादकांना डिव्हिडंड रूपानेही देतात अशी पध्दत गेली अनेक वर्षे संघामार्फत सुरू आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक व दूध संस्थांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. दरफरक आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्चवर जाहीर करून तो दिवाळीस व्याजासह देण्यात येतो अशी पध्दत महाराष्ट्रात केवळ गोकुळ दूध संघामध्येच आहे. याची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे.

      वार्षिक दूध दरफरक हा आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च मध्ये देण्यात येतो संघाचा वर्षाचा काटकसरीचा कारभार व मिळालेले उत्पन्न यामधुन खर्च वजा जाता शिल्लक राहणाऱ्या वाढाव्यावर दरफरक निश्चित केला जातो. वर्षा अखेरीस दरफरक जाहीर केला जातो २०१६-२०१७ मध्ये ०.५५ पैसे डिबेंचर्स घेतले आहेत. दूध दरफरक रक्कमेतुन डिबेंचर्स कपात करून घेणे अशी कामकाजाची पध्दत सन १९९२-१९९३ पासुन सुरू आहे त्यामुळे संस्थाना विश्वासात न घेता दूध दर फरक रक्कमेतुन परस्पर रक्कम कपात केली आहे या म्हणन्यात काही ही तथ्य नाही. खालील १० वर्षाच्या तपशिलावरून दर वर्षी डिबेचर्स घेतले जातात  हे लक्षात येर्इल. इतकेच नव्हे तर लाखो सुज्ञ दूध उत्पादक, दूध संस्था संचालक व सचिव यांना हे ज्ञात आहेच.

अ.क्र आर्थिक वर्ष डिबेंचर्स रक्कम प्र.लि

१ २०११-२०१२ प्र.लि. ०.१५ पैसे

२ २०१२-२०१३ प्र.लि. ०.१५ पैसे

३ २०१३-२०१४ प्र.लि. ०.२० पैसे

४ २०१४-२०१५ प्र.लि. ०.२० पैसे

५ २०१५-२०१६ प्र.लि. ०.२० पैसे

६ २०१६-२०१७ प्र.लि. ०.५५ पैसे

७ २०१७-२०१८ ——-

८ २०१८-२०१९ ——

९ २०१९-२०२० ——-

१० २०२०-२०२१ प्र.लि. ०.५५ पैसे

      आजपर्यंत संघाने दूध दरफरक रक्कम देणे व डिबेंचर्स कपात करणे ही पध्दत अवलंबली असुन गेल्या दोन तीन वर्षामध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती, महापूर, कोरोना या संकटामुळे दूध उत्पादकास दुधाचा जास्तीत जास्त दर देऊन व कोणतीही कपात न करता पैसे पोहोच करण्याचा प्रयत्न करून आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्‍ह्यातील कांही लोकांनी कोल्हापूरातील काही वृतपत्रे व प्रसार माध्यमाव्दारे डिबेंचर्स बाबत "गोकुळ कडून २२ कोटीचा फटका" अशी चुकीची, गैर समजुतीची व उत्पादकांची दिशाभुल करणारी बातमी प्रसिध्द केली आहे. दूध दरफरक व डिबेंचर्स बाबत दूध उत्पादक व दुध संस्था यांना सर्व माहिती असुन त्याबाबत गैर वक्तव्य करण्याचा प्रयत्न काही संस्था सचिवा कडून केला जात आहे ही खेदाची बाब आहे. दरफरक देताना डिबेंचर्स रक्कम संघाकडे घेऊन प्राथमिक दूध संस्थाना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे यात गैर असे काही नाही हे समजुन घेण्यासारखे आहे. संघाचे कामकाज लाखो दुध उत्पादक व दुध संस्था यांच्या योगदानातून सुरू आहे याची जाणीव संचालक मंडळास असून संघाची प्रगती व दूध उत्पादकांचा आर्थिक विकास व दूध संस्था सक्षम करणे या त्रिसुत्री पध्दतीने काम करण्यास आम्ही कटीबध्द आहोत असा खुलासा व विश्वास आम्ही या निवेदनाव्दारे आपणास देत आहोत असे संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील यांनी जाहिर केले आहे.

      

      

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!