भरती : देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Tim Global :
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन IBPS ने देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पैकी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
उमेदवार ७ ऑक्टोबरपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत,परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख देखील २७ आहे.