अद्याप तिरंगा उतरवला नसल्यास सन्मानपूर्वक उतरवून जतन करुन ठेवावा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच सर्वांनी आपल्या घरावर, खासगी आस्थापनांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला आहे. शासनाच्या सुचनांनुसार सर्वांनी राष्ट्रध्वज उतरवून सन्मानपूर्वक जतन करुन ठेवला आहे. तथापि अपवादात्मक ठिकाणी घरावर, दुकानांवर, गाडी व रिक्षांवर तिरंगा ठेवला असणाऱ्या नागरिकांनी सन्मानपूर्वक तिरंगा उतरवून जतन करुन ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवून इतरत्र पडू न देता व्यवस्थित घडी घालून जपून ठेवावा, असेही जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.