म्हैशीनेच केली चोरी उघड….
चोरलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली
Tim Global :
चक्क म्हैशीनेच चोरी केली उघड….
ही म्हैस माझी आहे तुम्ही चोरलेली आहे, असे शेतकरी सांगू लागला,म्हैस तुमचीच कशावरून असे दुसरा शेतकरी म्हणू लागला, यावेळी शेतकऱ्याने क्लुप्ती केली, आणि म्हैस सोडल्यावर कळेल असे म्हणत म्हैशीचे दावे सोडले, आणि बघता बघता सोडलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली,आणि चोरी उघड झाली, आणि चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या चांगलेच अंगाशी आले. या प्रकरणात एक चोरटा आणि चोरीची म्हैस विकत घेणारा शेतकरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
कुडित्रे ( ता . करवीर ) येथून चोरीला गेलेली जनावरे सांगोल्याच्या जनावरांच्या बाजारात सापडल्या, या चोरीतील दोघांना करवीर पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
महेश विलास पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली मुन्हा जातीची म्हैस, एक कर्नाळा म्हैस व सहा महिन्याचे रेडकू चोरीला गेले होते . याबाबत त्यांनी करवीर पोलिसात ५ डिसेंबर रोजी म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दिली होती .
दरम्यान महेश पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांनी रविवारी सांगोल्यातील जनावरांचा बाजार गाठून म्हैशीचा शोध घेत होते .
म्हैस दिसताक्षणी शेतकरी महेश पाटील ती ओळखली मात्र ग्राहकाने ही म्हैस तुमचीच कशावरून असा विरोध केला . यावेळी त्यांनी म्हैस सोडल्यावर कळेल असे म्हणताच सोडलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली, आणि चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या चांगलेच अंगाशी आले . हा प्रकार रविवारी सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात उघडकीस आला .
म्हैस खरेदी करणारे सांगोला तालुक्यातील चिकमहूद रहिवासी आहेत . या प्रकरणी दोघांना टमटमसह ताब्यात घेतले . तर दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे .