काँक्रीटचा टँकर नाल्यात ओतला ;
दुसरीकडे खड्ड्यात अपघात होऊन प्राण गमवावे लागतात
कोल्हापूर :
खड्ड्यात अपघात होऊन नागरिकांचा वाहनचालकाचा जीव जातो, असे चित्र असताना काँक्रीट चा अखंड टँकरच नाल्यात ओतला जातो ,कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील हा दुसरा प्रकार आहे,
बालिंग्या नंतर पुन्हा कळंबे तर्फ कळे फाटा गणपती मंदिर शेजारी नाल्यात अज्ञातांनी काॅंक्रीटचा टँकरच ओतला आहे, यामुळे नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्ग खड्डेमय झाला आहे, यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रस्ता पूर्णपणे उघडला आहे, वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे ,नॅशनल हायवे खात्याकडून सिमेंट काँक्रेट ने रस्त्यातील खड्डे भरण्याची काम सुरू असताना, रस्त्याच्या कडेला नाल्यात काँक्रीट टँकर ओतला जातो ही बाब आता गंभीर बनली आहे.
काही दिवसांपूर्वी बालिंगेच्या ओढ्यात काँक्रीट चा टँकर ओतला आहे. एकीकडे महागाई वाढत आहे, सर्वसामान्य नागरिकांना असे काँक्रीट खराब करणे परवडणारे नाही, यामुळे हा प्रकार कोणत्या खात्याचा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पुन्हा गगनबावडा रोड कळंबे तर्फ कळे फाटा गणपती मंदिर शेजारी नाल्यात काॅंक्रीट ओतले आहे.ते खड्यात किंवा रस्त्यांकडेला खाचरलेल्या ठिकाणी ओतले असते तर जास्त जनतेच्या फायद्याचे ठरले असते .या प्रकाराला आळा बसणार आहे का नाही, शासनाचा आणि जनतेचा पैसा असाच नाल्यात वाया जाणार का ? असे संतप्त प्रश्न नागरिकांच्यातून विचारले जात आहेत.
………………
संभाजी पाटील .ग्रामस्थ
नाल्यात काॅंक्रीट ओतले आहे.ते खड्यात किंवा रस्त्यांकडेला खाचरलेल्या ठिकाणी ओतले असते तर जास्त जनतेच्या फायद्याचे ठरले असते .एकीकडे खड्डे असताना काॅंक्रीट नाल्यात ओतले जाते, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.