माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर :
ग्रामीण भागात कोविड १९ लसीकरणाची गती वाढून लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी ज्येष्ठ, वृद्ध लोकांना त्यामुळे उपकेंद्रामध्येही कोरोना प्रतिबंधक लस देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील तसेच ४५ वर्षांवरील को ऑरबीट पेन्शटना लस दिली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ , वृद्ध नागरिक आहेत. या लोकांना वाडीवस्तीमधून, गावामधून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणे , आणणे जिकिरीचे होत आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्रत्येक उपकेंद्रात सीएचओ डॉक्टर यांची नेमणूक झालेली आहे. पदवीधरक डॉक्टरांकडून प्रत्येक उपकेंद्रात लस दिली गेल्यास लसीकरण वेळेत पूर्ण होईल. वयस्कर, दिव्यांग पुरुष – स्त्रिया यांना त्यांच्या गावालगतच्या उपकेंद्रात लस उपलब्ध झाल्याने लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश सफल होईल, असे सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे.