मराठा आरक्षणाची धग गावागावात पोचत आहे. गावागावांत जागृती मोर्चा, मशाल फेरी, कँडल मार्च, साखळी उपोषण सुरू आहे. करवीर तालुक्यातील महे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला. कॅन्डल मार्च काढून सर्व गावातून जागृती निर्माण केली व जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर कोणत्याही राजकीय व्यक्तींना गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेतला. तसेच आज बुधवारी (दि.1)रोजी गाव बंद ठेवून तहसीलदार यांना मराठा आरक्षण मागणीचा ग्रामपंचायतीचा ठराव देण्याचे ठरले आहे. यावेळी ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.