बीडशेड येथे केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या निर्षधार्थ रास्ता रोको
करवीर :
केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बीडशेड (ता.करवीर ) येथे किसान सभा, काँग्रेस यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन कृषि कायदे त्वरीत रद्द करा , शेतीमालाला रास्त भाव द्या , इंधनाचे दर कमी करा , मोदी हटाव देश बचाव आदि घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे करवीर पाश्चिम भागातील वाहतुक दोन तास ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलनाचे निमंत्रक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव नामदेवराव गावडे व काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांनी शेतकरीविरोधी तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी उतरला आहे. दिल्ली येथील आंदोलनात अनेक शेतकरी बांधवांनी बलिदान दिले आहे. तरीही केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल निषेध वक्त करून सरकारने शेतकऱ्यांचा मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली.
आंदोलनात काँग्रेस, किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना , आशा वर्कस् युनियन , लाल बावडा शालेय पोषण संघटना आदींचा सहभाग होता. कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शामराव गोधडे, माजी सरपंच नंदकुमार पाटील, चेतन पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, बाबुराव जाधव, अमर दिवसे , भगवान पाटील ,मच्छिंद्र कांबळे, दिनकर सुर्यवंशी , तानाजी तावडे उपस्थित होते.