भोगमवाडी येथे आम. पी.एन.पाटील यांच्या फंडातून मंजूर ५९ लाख लाखाच्या साकव कामाचा शुभारंभ
करवीर :
भोगमवाडी (ता.करवीर) येथील आम. पी.एन.पाटील यांच्या फंडातून व रामचंद्र भोगम यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या ५९ लाख लाखाच्या साकव कामाचा शुभारंभ सरपंच रंजना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक रामचंद्र भोगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्योजक रामचंद्र भोगम म्हणाले, करवीर तालुक्यातील तेरसवाडीपैकी तेरसवाडी, भोगमवाडी, मल्लेवाडी या वाड्यावस्तीवर आम. पी.एन.पाटील यांनी असलेल्या कमी मतांचा विचार न करता गत ३ वर्षात कोट्यावधीचा निधी विकासासाठी दिला आहे. भोगमवाडी येथील ओढ्यावर पावसाळ्यात पाणी यायचे त्यामुळे वाहतुकीस मोठे अडथळे यायचे. या ओढ्यावर होणाऱ्या नवीन साकव कामामुळे वाडीवरील वाहतुकीस सुलभता येणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उद्योजक भोगम पुढे म्हणाले, करवीर तालुक्यातील वाड्यावस्तीवरील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी आदी गावे विकासापासून वंचित होती. आम. पाटील यांनी या परिसरातील विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. मते किती यापेक्षा विकासकामे महत्वाची मानणाऱ्या आम. पाटील यांच्या उदात्त धोरणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत.
यावेळी माजी सरपंच बळवंत पाटील, ग्रा.पं. सदस्य बबन कदम, सुनीता जगताप, पो पा. लक्ष्मण पाटील, परसू कदम, रघुनाथ भोगम, दत्तात्रय शेलार, कृष्णात पाटील, धनाजी भोगम यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते. आभार कॉन्ट्रॅक्टर सागर ढेरे यांनी मानले.