भरती : भारतीय स्टेट बँकेची विशेषज्ञ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
Tim Global :
भारतीय स्टेट बँक (SBI) ने विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय स्टेट बँक भरती २०२१ साठी sbi.co.in वर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी अथवा त्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरी इच्छुक १८ ऑक्टोबर पर्यंत अधिकृत वेबसाइट sbi.co.in/careers किंवा bank.sbi/careers द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर तपासा.
एकूण ६०६ पदांची भरती केली जाईल. ज्यात रिलेशनशिप मॅनेजरची ३१४ पदे, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) ची २० पदे, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हची २१७ पदे, गुंतवणूक अधिकाऱ्याची १२ पदे, सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) ची २ पदे, सेंट्रल रिसर्च टीम २ पदे, व्यवस्थापक ची १२ पदे, उपव्यवस्थापक (विपणन) ची २६ पदे आणि कार्यकारी पदाची १ पद , उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी , पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २३ वर्षे ते ३५ वर्षे दरम्यान असावे. तर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) पदासाठी २८ वर्षे ते ४० वर्षे, ग्राहक संबंध कार्यकारी साठी २० वर्षे ते ३५ वर्षे आणि गुंतवणूक अधिकारी साठी २८ वर्षे ते ४० वर्षे तर व्यवस्थापक साठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे, उपव्यवस्थापक साठी ३५ वर्षे आणि कार्यकारी पदासाठी ३० वर्षे आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.