बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून, ९ फेब्रुवारी २०२२ पासून उपलब्ध
मुंबई :
Maharashtra state board 12th exam Hall ticket
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून, ९ फेब्रुवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहे. हॉलतिकीट दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ रोजी होणार आहे.
विद्यार्थांना हॉलतिकीट http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.
प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करण्यासाठी….
सर्वप्रथम महा एसएससी बोर्डाची वेबसाइट http://www.mahahsscboard.in उघडा.
आता अपडेट्स विभागात ‘ डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट २०२२ लिंक’ वर जा.
त्यानंतर महा एसएससी १०वी हॉल तिकीट २०२२ किंवा महा एचएससी १२वी हॉल तिकीट २०२२ यापैकी निवडा.
तुमचा महा एचएससी हॉल तिकीट २०२२ पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर किंवा नाव किंवा नोंदणी क्रमांक जन्मतारीखं टाकून एंटर करा.
त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करा.