भविष्य निवार्ह निधी कार्यालय कोल्हापूर यांचे वतीने गोकुळ संघ व इतर कर्मचाऱ्यांना पेन्शन स्किम सर्टिफिकेट वाटप
कोल्हापूर :
भविष्य निवार्ह निधी कार्यालय कोल्हापूर यांचे वतीने श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार यांचे प्रयास उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ लि कोल्हापूर (गोकुळ ) यांचे संयुक्त विद्यमाने गोकुळ संघ व इतर संस्थाचे ५८ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम सर्टिफिकेट वाटप कार्यक्रम गोकुळ दूध संघाच्या ता. पार्क कार्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाला.या प्रसंगी मा.सहाय्यक आयुक्त भविष्य निवार्ह निधी विभाग श्री.अमित चौगुले, सहा. आयुक्त. वैभव डोंगळीकर, विशाल शेटेसो, श्रीकांत बरगे, रवींद्र दामोदर,यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने प्रयास योजनेंतर्गत ५८ वर्ष पूर्ण झाले त्या महिन्यात पेन्शन सुरु करणेचा भारत सरकारचा उपक्रम सुरू आहे. त्या अनुषंगाने गोकुळ दूध संघाचे ५ कर्मचारी व इतर संस्थेचे ५ कर्मचारी अश्या १० कर्मचार्यांना पेन्शन स्कीम सर्टिफिकेट प्रदान कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना अजित चौगले म्हणाले गोकुळने व इतर संस्थानी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रा.फंड कार्यालयाकडे पाठवणेची व्यवस्था करावी.जेणेकरून संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये पेन्शन स्कीमचे पैसे मिळतील व उर्वरित आयुष्यात त्यांना फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना वैभव डोंगळीकर म्हणाले गोकुळ सारख्या सहकारातील अग्रगण्य संस्थेला व इतर संस्थाना सहकार्य करू असे आश्वासन दिले.व गोकुळच्या कामकाजा बद्दल व व्यवस्थापना बद्दल मा. चेअरमनसो व संचालक मंडळ यांचे कौतुक केले.
तसेच कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावीक संघाचे वरिष्ठ अधिकारी बाजीराव राणे यांनी केले. व आभार एम.पी.पाटील यांनी मानले.