बारावीचा निकाल ९९.६३ टक्के जाहीर : ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले :
दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली
मुंबई :
राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल आज मंगळवार, दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येणार आहे. दरम्यान, राज्य मंडळाने बारावीचा निकाल ९९.६३ टक्के जाहीर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील , यांनी निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. सर्व विभागिय मंडळातून विद्यार्थिनींचा निकाल ९९.७३ टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४ टक्के आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यातील बारावीच्या निकालानुसार एकूण ९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल ९९.८१ टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. त्यापाठोपाठ मुबंई (९९.७९), पुणे (९९.७५), कोल्हापूर (९९.६७), लातूर (९९.६५), नागपूर (९९.६२), नाशिक (९९.६१), अमरावती (९९.३७) आणि औरंगाबाद (९९.३४) या विभागांचा क्रमांक लागतो.
विद्यार्थ्यांना दुपारी चार वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. यावर्षी सर्वाधिक ९९.८१ टक्के निकाल कोकण विभागाचा आणि सर्वात कमी ९९.३४ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. तर, १६० पैकी ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.
निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.करोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.
या ठीकाणी चार वाजता पाहता येणार निकाल
https://hscresult.net
11admission.org.in
https://msbshse.co.in
शाखेनिहाय निकाल….
विज्ञान शाखा – ९९.४५ टक्के कला शाखा – ९९.८३ टक्के वाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ९८.८० टक्के