Tim Global :

भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे आहे. पात्र उमेदवार शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कार्यकारी शाखा, शिक्षण शाखा आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेसाठी joinindiannavy.gov.in या अधिकृत बेवसाईटद्वारे अर्ज करू शकतात.

या भरती अंतर्गत एकूण २४२ पदे भरण्यात येणार असून त्यापैकी १५० पदे कार्यकारी शाखेसाठी, १२ पदे शिक्षण शाखेसाठी आणि ८० रिक्त पदे तांत्रिक शाखेसाठी भरली जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

भारतीय नौदल भरती २०२३ –

पदाचे नाव आणि त्यासाठीची रिक्त पदे

एकूण रिक्त पदे – २४२

सामान्य सेवा- ५० पदे
हवाई वाहतूक नियंत्रक- १० तर नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (NAOO) २० पदे.
पायलट – २५
लॉजिस्टिक्स – ३०
नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर १५
शिक्षण – १२
अभियांत्रिकी शाखा [सामान्य सेवा (GS)] – २०
इलेक्ट्रिकल शाखा [सामान्य सेवा (GS)] – ६०
पात्रता निकष –

पदवी/पदव्युत्तर पदवी असलेलेा उमेदवार किंवा अंतिम वर्षात समतुल्य CGPA मध्ये किमान ६० टक्के गुण असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

निवड प्रक्रिया ही अर्जांच्या शॉर्टलिस्टिंगवर आधारित आणि उमेदवारांनी पदवीमध्ये मिळवलेल्या सामान्य गुणांवर आधारित असेल.

असा करा अर्ज –

भारतीय नौदलाच्या भरतीसाठी उमेदवार http://www.joinindiannavy.gov.in या अधिकृत बेवसाईटद्वारे अर्ज करू शकतात.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!