नोकरी : भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
Tim Global :
भाभा अणुसंशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. BARC ने तांत्रिक अधिकारी आणि इतर रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट barc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.
५० रिक्त जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय आणि वैज्ञानिक अधिकारीच्या १५ आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या ३५ पदांवर भरती केली जाणार आहे. अधिक माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची मदत घ्यावी. उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज फी ५०० रुपये असून उमेदवाराने हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.