बीडशेड येथे श्री महालक्ष्मी फर्निचर मॉलचे उद्घाटन : पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद ; एकाच छताखाली सर्व व्हरायटी
करवीर :
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बीडशेड (ता.करवीर) येथे संदीप मधुकर सुतार यांच्या श्री महालक्ष्मी फर्निचर मॉलचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. फर्निचरच्या सर्व व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध असल्याने दिवसभर ग्राहकांनी मोठी गर्दी होती.

बीडशेड येथे श्री महालक्ष्मी मल्टिपर्पज हॉलच्या समोर सुमारे १० हजार स्क्वेअर फुटामध्ये भव्य व प्रशस्त असे फर्निचर शोरूम उभारले आहे. गेली १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुतार यांनी ग्राहकांना फर्निचरच्या सर्व व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.

उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सोफा सेट, बेड, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, दिवान, टीपॉय, शोकेस, तिजोरी, प्लास्टिक खुर्ची, आदी वस्तूंवर १० ते ५०% पर्यंतची सूट मर्यादित कालावधीसाठी देण्यात आली आहे.
बीडशेड येथे भव्य असे फर्निचर शोरूम सुरू झाल्याने उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. रात्रीपर्यंत ग्राहकांचा ओढा कायम होता. मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मॉलचे प्रोप्रायटर संदीप सुतार यांनी ग्राहकांचे आभार मानले. तसेच ग्राहकांच्या विश्वासार्ह सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे सांगितले.