महाराष्ट्रात मोठी भरती : जाणून घ्या माहिती
Tim Global :
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी
लिमिटेड मध्ये अभियांत्रिकी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत मुख्य अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यासह इतर पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी १९ एप्रिल २०२२ पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेद्वारे, सहाय्यक अभियंता (ट्रान्स, टेलिकॉम, सिव्हिल) च्या २२३ पदांची भरती केली जाईल. याशिवाय जाहिरात क्रमांक 03/2022 अंतर्गत मुख्य अभियंता पदाच्या ४ पदे, अधीक्षक अभियंता पदाच्या १२ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता …..
मुख्य अभियंता (ट्रान्स) या पदासाठी, उमेदवारांना विद्युत इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/टेक्नोलॉजीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. आणि पॉवर सेक्टरमध्ये १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर, सुपरिटेंडिंग इंजीनियर (ट्रान्स) साठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील एकूण १२ वर्षांचा अनुभव मागितला आहे
कार्यकारी संचालक – ५९ वर्षेCGM-५० वर्षेमुख्य अभियंता – ५० वर्षेअधीक्षक अभियंता – ४५ वर्षे
अर्ज …..या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. “मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-१९, ७ वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई 400051 यांना अर्ज पाठवायचा आहे. यासाठी खुल्या जाती प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रुपये आणि आरक्षित श्रेणी आणि EWS उमेदवारांसाठी ४०० रुपये अर्जाची फी आकारली जाईल.