करवीर :

यशवंत सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची आधारवड आहे. सर्व ग्राहकांना यशवंत परिवारातील एक सदस्य या नात्याने नेहमीच आर्थिक पाठबळ दिले आहे.
कोरोना महामारीमुळे समाजामध्ये आर्थिक अस्थैर्यतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अडचणीच्या वेळी बँकेने समाजाप्रती आपले उत्तरदायित्व म्हणून आपल्या ग्राहकांना व गरजूंना आर्थिक स्थैर्य व उभारी देण्यासाठी विविध किफायतशीर व्याजदराच्या कर्ज योजना सुरू केल्या आहेत. तसेच बँकेच्या वतीने कर्ज व्याजदरांमध्ये सरासरी एक ते दोन टक्के कपात केली आहे. तरी बँकेच्या सभासद व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले रिबेट पात्र किफायतशीर कर्ज व्याजदर १ जुन २०२१ पासून कमी करण्यात आला आहे.
यामध्ये सोने तारण कर्ज १२.३० टक्के व्याजदरा वरून कमी करून दहा टक्के करण्यात आले आहे.
नवीन घर बांधणी फ्लॅट खरेदी साठी १२ टक्के व्याजदर होते ते कमी करून १०.५० टक्के केले आहे. स्थावर तारण कर्ज १६ टक्के वरून कमी करून १२ टक्के केले आहे.
नवीन वाहन खरेदी कर्ज १२ टक्के वरून १०.५० टक्के केले आहे.
नवीन मशनरी कर्ज १४ टक्के वरून १२ टक्के केले आहे. कॅश क्रेडिट १५ टक्के वरून १३ टक्के केले आहे. बँकेच्या सुमारे सहा हजार कर्जदारांना याचा लाभ होणार आहे. सभासद व ग्राहकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा बँकेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक आबाजी शेलार ,सर्जेराव पाटील, एडवोकेट प्रकाश देसाई ,एस के पाटील, सरदार पाटील, सुभाष पाटील, सर्व संचालक ,मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस कांबळे उपस्थित होते.