भूस्खलनात दगावलेल्या कुपले दांपत्यांच्या कुटुंबीयांचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले सांत्वन
राधानगरी :
कोनोली ग्रामपंचायत पैकी कुपलेवाडी (ता.राधानगरी) येथील भूस्खलनात दगावलेल्या कुपले दांपत्यांच्या कुटुंबीयांची गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांनी भेट घेऊन सांत्वन केले व कुपले कुटुंबाला धीर दिला.
कुपलेवाडी येथे बेंदुर सणादिवशीच रात्री ११ वाजता भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात कुपलेवाडी येथील वसंत लहू कुपले व त्यांची पत्नी सुसाबाई वसंत कुपले हे दांपत्य दगावले गेले. तसेच
४ जनावारेही घरावर दरड कोसळून दगावले गेले. त्यामुळे कुपले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाला धीर देण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांनी कुपलेवाडी येथे जाऊन कुपले कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मदतीचे आश्वासनही दिले. यावेळी विलास पाटील (चांदे ) व ग्रामस्थ उपस्थित होते.