करवीर :
करवीर तालुक्यातील वंचित आणि निराधार नागरिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन करवीर संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार शितल भामरे मुळे प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले आज पहिली मीटिंग झाली,यावेळी १८० लाभार्थी पात्र झाले आहेत. आमदार पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील निराधार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.असे सांगून महिन्याची पेन्शन ज्या त्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले,दाखले देण्या संदर्भात नागरिकांना अडचणी येत आहेत, तलाठ्यांची एकत्र मीटिंग घेऊन तो प्रश्न सोडविला जाईल, तसेच शासनाकडे उत्पन्नाची अट ४४ हजार करावी, आणि मुलांच्या २५ वय वर्षावरील अट रद्द करावी अशा मागण्या करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.दोन वर्षे बंद असलेल्या जुन्या पेन्शन त्याची माहिती मागविल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महसूल भवन येथे करवीर संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत अध्यक्ष संदीप पाटील यांचा सत्कार तहसीलदार शीतल भामरे मुळे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी झालेल्या बैठकीत सांघाय तहसीलदार शर्मिला गोसावी,
समिती सदस्य शिवाजी देसाई, विजय पोवार, दयानंद कांबळे, निकिता निगडे, सर्जेराव पुजारी, उदय सुतार, सरदार सावंत, पांडुरंग पाटील ,सर्जेराव काशीद उपस्थित होते. आभार शिवाजी देसाई यांनी मानले.