भोगावती गळीत हंगाम शुभारंभ : सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर
भोगावती :
सहा लाख टनाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केले.
भोगावती साखर कारखान्याच्या ६४व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ऊस गव्हाणीचे पूजन कारखान्याच्या संचालिका अनिता भिमराव पाटील व त्यांचे पती बी.ए.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिध्दार्थ पाटील, मयूर शेळके, सुहास चव्हाण यांचा भोगावती साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर पुढे म्हणाले, भोगावती साखर कारखाना चांगला चालला पाहिजे. जास्तीत जास्त ऊस गाळप होणे गरजेचे आहे.
यावेळी बी.के.डोंगळे, मयुर शेळके, सिध्दार्थ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत संचालक विश्वनाथ पाटील यांनी केले. प्रास्ताविक बी.ए.पाटील यांनी केले.आभार भोगावतीचे संचालक पांडुरंग पाटील यांनी केले.
कार्यक्रमास भोगावती साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील कौलववकर, ज्येष्ठ संचालक कुष्णराव किरुळकर,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी.डी.धुंदरे,राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले,प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील,भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,संचालक बंडोपंत वाडकर, अभिषेक डोंगळे, कार्यालयीन अधिक्षक सुरेश कांबळे,सर्व संचालक, शेती अधिकारी शत्रुघ्न पाटील,
अधिकारी, शेतकरी, सभासद, कर्मचारी, तोडणी,ओढणी कंत्राटदार आदी विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.