भुदरगड :
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये आणि परिसरातील शेतांमधे ‘अंजिन’ (एलो जॅकेट)माशांच्या हल्ल्यामुळे सातेरी (एपीस सिराना इंडिका )जातीच्या मधमाशांच्या वसाहतींच्या संखेत खुप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे मध उद्योजक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या वर्षी जून-जुलै महिण्यात आलेल्या अंजीन नावाच्या माशांच्या हल्ल्यामुळे सातेरी जातीच्या मधमाशांच्या वसाहती नष्ट झाल्या आहेत.या अंजीन माशा गांधिल माशीच्या प्रवर्गातील आहेत.इंग्रजी भाषेत त्यांना (Yellow jacket)एलो जॅकेट असं म्हणतात. आणि गावठी भाषेत त्यांना तुमसाडची माशी असे म्हणतात.त्या समुहानं 3-5 चौरस फुटांपर्यंत मोठं घरटं करुन राहतात.यांच्या घरट्यामधे साधारणतः(अंदाजे) 500-5000 पर्यंत माशा असतात.या माशा किटकभक्षी आहेत.समुहानं राहतात पण कुठल्याही प्रकारचा मध किंवा पराग जमा करत नाहीत.या सातेरी जातीच्या मधमाशांच्या पेक्षा आकाराने 10 पट पेक्षा जास्त मोठ्या असतात.या माशा खुप विषारी असतात, चुकून जर त्यांच्या घरट्याला धक्का लागला तर त्या समुहानं आक्रमण करतात. आणि इजा पोहचविणार्या माणसाला किंवा जनावराला बेजार करून सोडतात.माणसाला जर एका वेळी 20-25 माशांनी डंख मारला तर माणसाचा जीव जाऊ शकतो,या माशा एवढ्या दाहक विषारी आहेत.
या माशा सातेरी जातीच्या मधमाशांच्या पेटीमधे किंवा ढोलीमधे समुहानं घुसतात किंवा आत घुसता येत नसेल तर पेटीच्या किंवा ढोलीच्या तोंडावर बसुन राहतात, आणि बाहेर येणार्या प्रत्येक मधमाशीला अगदी अलगद पकडून खातात. आणी आपल्या घरट्यामधे नेऊन आपल्या पिल्लांना खायला देतात. हे असे गेल्या जून महिन्यापासून ते आत्तापर्यंत चालू आहे.यांच्या या आक्रमणात लहाण आणि कमी संख्या असलेल्या मधमाशांच्या वसाहती पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत, आणि कांही मोठ्या असलेल्या वसाहती जंगल सोडून कमी त्रास असलेल्या भागात निघुन गेल्या आहेत.अशी माहिती मध उद्योजक शेतकरी यांनी दिली आहे.
पावसाळ्यातील मोठा संततधार पाऊस आणि या अंजिन माशांच्या त्रासामुळे सातेरी जातीच्या मधमाशांच्या वसाहतींच्या संखेत खुप मोठ्या प्रमाणात घट झाली, असल्यामुळे पश्चिम घाट परिसरातील मध उद्योग खुप मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.मध उद्योजक शेतकरी हवालदिल झाले आहेत.माशाच शिल्लक नाही राहिल्या तर मध मिळणे कठीण झाले आहे./
मध उद्योजक शेतकरी सचिन आनंदराव देसाई,रा. अंतुर्ली