वाकरे येथे भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांच्या कळपावर हल्ला दहा बकरी फस्त
करवीर :
वाकरे ता.करवीर येथे भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केला.यामध्ये दहा बकरी फस्त केली. खुपिरे येथील मेंढपाळांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
खुपीरे येथील मेंढपाळांचे बकऱ्याचे कळप वाकरे येथील शेतकऱ्यांच्या शेतात , चारण्यासाठी व तळ बसण्यासाठी आहे आले होते.
आज सकाळी अचानक भटक्या कुत्र्यांनी , शेतात बसलेल्या व झाकून ठेवलेल्या लहान पीलांच्यावर सुमारे वीस कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्यामध्ये मोठी चार बकरी कुत्र्यांनी फस्त केली. तीन बकरी कुत्र्यानी उसामध्ये ओढत नेऊन फस्त केली. पाणी बसलेल्या ठिकाणी तीन पिल्ली मरून पडली आहेत. यामध्ये मेंढपाळ मळाप्पा हराळे,बिरू हराळे, आनंदा हराळे, व गणपती हराळे त्यांची सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमी बकऱ्यांच्या वर खुपिरे पशुवैद्यकीय दवाखान्याचे वतीने उपचार केला आहे . लॉक डाउन मुळे मेंढपाळ बाहेर जिल्ह्यात जाऊ शकत नाही त्यामुळे आर्थिक अडचणीत आहेत, आणि ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बकरी चारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच असे प्राण्यांचे हल्ले झाल्याने मेंढपाळ मेटाकुटीला आला आहे .
यावेळी मेंढपाळांनी पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
भटक्या कुत्र्यांचे व वन्य प्राण्यांचे बकऱ्यांच्यावर हल्ले वाढले आहेत, वन्य प्राण्यांच्या कडून हल्ला झाल्याचा मोबदला मिळतो मात्र , भटक्या कुत्र्यांच्या मुळे हल्ला झाल्यास भरपाई मिळत नाही, ही भरपाई मिळावी अशी मागणी आहे.लॉक डाउन मुळे मेंढपाळ बाहेर जिल्ह्यात जाऊ शकत नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत आहेत, आणि ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बकरी चारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संजय वाघमोडे,
संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य.