कोल्हापूर :
बेघर वृद्धांना वाचविण्यासाठी आणि अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना सोयी सुविधा पुरविणे व संदर्भ सेवा देण्याकरिता सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, महाराष्ट्र शासन व जनसेवा फौंडेशन, पुणे यांच्या भागीदारीत राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर १४५६७ असून बेघर व गरजू वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या काळजीसाठी व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय हेल्प लाईनवर संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या रितीने घालवता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क,शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्य शासनाने दि.१४/६/२००४ रोजी ज्येष्ठ नागरिक धोरण २००४(भाग-१)जाहीर केले आहे.
हेल्प लाईनसाठी अधिक माहिती करिता क्षेत्रीय प्रतिनिधी सागर कोगले, संपर्क क्रमांक ९०९६१८६९८४ यावर संपर्क साधावा.