आवाहन : एफआरपी विरोधात रस्त्यावरची लढाई करून न्याय मिळवून दिल्यास एक एकर जमीन बक्षीस
शिरोळ :
एकरकमी एफआरपी देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नीती आयोगानंतर आता केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने एफआरपी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी विरोध केला होता. असा प्रयत्न झाल्यास पुन्हा साखर उद्योग आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यांने राजू शेट्टी वगळता अन्य कोणी एफआरपी विरोधात रस्त्यावरची लढाई करून न्याय मिळवून दिल्यास एक एकर जमीन बक्षीस देण्याची तयारी दर्शवली आहे.
नांदणी येथील रामगोंडा पाटील या शेतकऱ्यांने आपल्याकडील १८ एकर पैकी एक एकर जमीन बक्षीस स्वरूपात देण्याची तयारी दर्शवली आहे.
हे आवाहन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.