करवीर :
जिल्ह्यासह करवीर
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.यामुळे सीपीआर सेंटरवर ताण वाढत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी करवीर तालुक्यातील
शिंगणापूर कोविड सेंटर ऑक्सीजन बेडसह तात्काळ सुरु करावे, अशी मागणी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. तसेच डी.सी. नरके विद्यानिकेतन, के.आय. टी. कॉलेज, कुरुकली कोविड सेंटरही प्रशासनाने सज्ज ठेवावे अशी मागणी केली.
कोविडच्या पहिल्या लाटेत शिंगणापूर कोविड सेंटरची चांगली कामगिरी झाली. शिंगणापूर सेंटरवर ५६ बेड असून २७ ऑक्सीजन बेड आहेत. यामुळे शिंगणापूर सेंटर हे करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरातील रुग्णांसाठी महत्वाचे सेंटर आहे. करवीर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिंगणापूर सेंटर तात्काळ सुरू करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली केली आहे. आणि प्रशासनाने सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितले.
तसेच येत्या कालावधीत रुग्णांची संख्या वाढेल असे चित्र असल्यामुळे तालुक्यातील डी.
सी.नरके ,के.आय.टी.कॉलेज व कुरुकली येथील सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली.