कोल्हापूर जिल्ह्यात ३लाख ९३ हजात ६३७ व्यक्तींना ‘ बूस्टर डोस’ : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पासून कोरोना प्रतिबंधक लसीचा ‘बूस्टर’ डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. याचा शुभारंभ आज कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३ लाख ९३ हजार ६३७ व्यक्तींना हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये *१८ वर्षांवरील ९३% लाभार्थ्यांनी पहिला डोस तर ७१% लाभार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण केले आहे.
हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांनी पहिले जे दोन डोस ज्या कंपनीचे घेतले आहेत, त्याच कंपनीचा डोस ‘बूस्टर’ साठी दिला जाणार आहे.
हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असतील त्यांनाच हा बूस्टर डोस मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेतला येईल.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी, कोल्हापुरातील बूस्टर डोस साठी पात्र ज्येष्ठानी लवकरात लवकर आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे, अशी विनंती केली.