कोल्हापूर :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 141.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, तुळशी नदीवरील-बीड, वारणा नदीवरील-चिंचोली व माणगाव, कुंभी नदीवरील- कळे, मांडूकली, सांगशी व शेणवडे, कासारी नदीवरील- यवलूज, वेदगंगा नदीवरील- वाघापूर व निळपण, दुधगंगा नदीवरील- दत्तावाड, असे एकूण 22 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 58.68 दलघमी, वारणा 739.07 दलघमी, दूधगंगा 375.21 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 42.12 दलघमी, कुंभी 58.08 दलघमी, पाटगाव 73.89 दलघमी, चिकोत्रा 26.20 दलघमी, चित्री 38.72 दलघमी, जंगमहट्टी 17.01 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 19.70, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 28.10 फूट, सुर्वे 27.8 फूट, रुई 57 फूट, इचलकरंजी 53 फूट, तेरवाड 47.8 फूट, शिरोळ 36 फूट, नृसिंहवाडी 32.1 फूट, राजापूर 23 फूट तर नजीकच्या सांगली 9.9 फूट व अंकली 11.10 फूट अशी आहे.
गगनबावडा येथे 103.8 मिमी पाऊस….
जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 103.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 13.6 मिमी, शिरोळ- 6.3 मिमी, पन्हाळा- 39.8 मिमी, शाहूवाडी- 64.7, राधानगरी -77.9, गगनबावडा- 103.8, करवीर- 34.9 मिमी, कागल- 36.4 मिमी, गडहिंग्लज- 30.4 मिमी, भुदरगड- 48.1 मिमी, आजरा-35.5 मिमी व चंदगड- 29.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.