ब्रह्मपुत्रा नदीत एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बोट बुडाली अनेकांचा मृत्यू : बोटीवर १२० हून अधिक प्रवासी होते
Tim Global :
आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीतील निमाटी घाटाजवळ एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बोट बुडाली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Tweet
ANI
@ANI
Assam | Two boats carrying approximately 120 passengers collided in the Brahmaputra river in Jorhat today, many passengers missing; rescue operation underway: DG NDRF Satya N. Pradhan
आयडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बोटीवर १२० हून अधिक प्रवासी होते, परंतु त्यातील अनेकांना विभागाच्या मालकीच्या ‘ट्रिपकाई’ नौकेच्या मदतीने वाचवण्यात आले. जोरहाटचे उपायुक्त अशोक बर्मन यांनी सांगितले.
आतापर्यंत ४१ जणांना वाचवण्यात आले आहे. आतापर्यंत एकही मृतदेह सापडला नाही. जोरहाट जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की किती लोकांचा मृत्यू झाला, हे आम्ही अद्याप सांगू शकत नाही.
NDRF आणि SDRF जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदीत पडलेल्या बोटीमध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकीही होत्या.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली आणि माजुली आणि जोरहाटच्या जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मंत्री बिमल बोरा यांना अपघातस्थळी जाण्यास सांगितले.
Narendra Modi
@narendramodi
Saddened by the boat accident in Assam. All possible efforts are being made to rescue the passengers. I pray for everyone’s safety and well-being.
7:14 PM · Sep 8, 2021
16.8K
389
Copy link to Tweet
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी सर्व शक्य प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.